Prakash Ambedkar | NCB चे अधिकारी वानखेडे हिंदू की मुस्लिम? प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान, वाचून दाखवला SC चा निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे हे हिंदू (Hindu) आहेत की मुस्लिम (Muslim) यावर मागील अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य रंगू लागले आहे. यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aghadi) प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लीम या प्रश्नाचे उत्तर देताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) एक निकाल वाचून दाखवला आणि त्यानुसार समीर वानखेडे (Sameer Wankhede) जे म्हणत आहेत ते बरोबर असल्याचे सांगितले. समीर वानखेडे यांनी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी स्विकारलेला मुस्लीम धर्म न स्विकारता वडिलोपार्जित हिंदू धर्म स्विकारल्याचे जाहीर केले, असेही त्यांनी नमूद केले.

 

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्विकारला आणि नंतर समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वयात आल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जीत धर्माचं असल्याचे जाहीर केले. यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल त्यांनी वाचून दाखवला. सिव्हिल नं.7065/2008 हा निकाल 26 फेब्रुवारी 2005 रोजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा (Justices Deepak Mishra) आणि गौवडा जी (Gowda G.) यांनी दिला आहे.

 

समीर वानखेडेंचं म्हणणं बरोबर

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार समीर वानखेडे यांचं म्हणणं बरोबर आहे. सध्या समीर वान=खेडे यांचं प्रकरण जातपडताळणी समितीकडे (Caste Verification Committee) गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या प्रकरणातील पक्षकार पाहिले तर के.पी.मन्नू विरुद्ध जातपडताळणी समिती अशीच आहे. त्यामुळे माझ्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्विकारला असला तरी मी वयात आल्यानंतर तो स्विकारलेला नाही हे समीर वानखेडे यांचे म्हणणं बरोबर असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

 

मुलाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार

18 वर्षांचा होईपर्यंत कुठलंही मुल आपल्या आई-वडिलांच्या ताब्यात असते. त्यामुळे पालक म्हणून आई-वडिलांनी केलंय ते त्या मुलाला लागू होतं असं नाही. त्या मुलाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार असतो. म्हणून समीर वानखेडे यांच्या जात (Caste) आणि धर्माबाबतचा (Religion) उपस्थित केलेला मुद्दा या निकालात पूर्णपणे समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देखील याच संदर्भात होता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

न्यायालयाने मुलाचे म्हणणं ग्राह्य धरलं

या प्रकरणात विडिलांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला मात्र मुलाने वडिलोपार्जित धर्म स्विकारला. त्यामुळे त्या मुलाने तो मादिगा आहे असं म्हटलं. तसेच त्याचं प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाचा निकाल मुलाच्या विरोधात लागला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मुलाचं वडिलोपार्जित धर्माचं म्हणणं ग्राह्य धरलं. तसेच मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) मान्य केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

 

कुळानुसार मुलाला वडिलोपार्जीत जात मिळते

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालात कुळ हा शब्द वापरला आहे.
तसेच त्या कुळातून मुलाला बाहेर काढलं गेलं नाही. त्यामुळे कुळानुसार मुलाला वडिलोपार्जित जात मिळते असं म्हटलंय.
समीर वानखेडे यांच्याबाबत वर्तमानपत्रांमधून मी जे वाचतोय ते प्रकरणं असंच आहे, असं वाटतं.
त्यामुळे समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र रद्द होईल असे वाटत नाही, असंही त्यांनी म्हटले.

 

Web Title :- Prakash Ambedkar | BVA prakash ambedkar quote supreme court judgement whether sameer wankhede hindu or muslim marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा