सूर्याप्रमाणेच देशात BJP आणि RSS ला ‘ग्रहण’ लागलंय : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्याप्रमाणे सुर्याला ग्रहण लागलं आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ग्रहण लागलं आहे. त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात गुरुवारी वंचितनं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीएए कायदा हिंदूंवर परिणाम करणारा आहे. त्याला विरोध म्हणून हे आंदोलन आहे. पोलिसांनी विरोध केला तरी आम्ही आंदोलन करू. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना जिल्हा बंदी यासह काही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिली. ते काळजी घेतील.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं सीएम व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. अमित शहा आणि मोदी हे मुद्दाम संभ्रम तयार करतात. वेगळी विधानं देतात. नागरिकत्व कायद्याचा फटका केवळ मुस्लिमांनाच नाही तर हिंदूंनाही बसणार आहे. तब्बल 40 टक्के हिंदू या काद्यामुळे अडचणीत येणार आहेत.” असे ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/