‘वंचित’वर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा ४० लाख मतदारांची माफी मागा : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतरही वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे असा सातत्याने आरोप करण्यात येत आहे. आमच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा’ अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबडेकरांना आघाडीत येण्यासाठी खुली ऑफर दिली. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मिळालेली मतं काही ठिकाणी जास्त होती तर काही ठिकाणी कमी होती. जवळपास ४० लाखांहून अधिक मतदान वंचितला झालं.

वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले. असा आरोप आमच्यावर होतो. काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्या बरोबर यायला तयार आहात का ? तुम्ही आमचं स्टेटस काय धरता ? वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे. असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने या आरोपाबाबत एकदा आपली भूमिका जाहीर करावी. आमच्यावर आरोप करणाऱ्यांकडे पुरावे नसतील तर त्यांनी ४० लाख मतदारांची माफी मागावी.’

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही मित्रपक्षांची चाचपणी करत आहोत. त्यांचे आणि आमचे एकमत झाले तर एकत्र निवडणूक लढवू, अन्यथा विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागा लढण्यास सक्षम आहोत. येत्या २० तारखेला उमेदवारांची पहिली यादी आणि जाहीरनामा प्रसिद्ध करू, अशी घोषणाही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.