Prakash Ambedkar – Lok Sabha Elections | दिवाळीनंतर देशात ‘कत्तल की रात’… – प्रकाश आंबेडकर

मुंबई : Prakash Ambedkar – Lok Sabha Elections | आगामी विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Elctions) आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा जनतेला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र आराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दिवाळीनंतर देशात ‘कत्तल की रात’ होईल. निवडणुकीपूर्वी या कधीही झाली नाही अशी अराजक स्थिती होईल, असा सावधगिरीचा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Prakash Ambedkar – Lok Sabha Elections)

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी याअगोदरही म्हटले की येथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाही, तशी परिस्थिती होऊ शकते. (Prakash Ambedkar – Lok Sabha Elections)

त्यामुळे सर्व भारतीयांना माझा आग्रह आहे की, कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी मतदान होईपर्यंत सर्वांनी शांतता राखावी. मी आधीच सर्वांना शांततेचे आवाहन करत आहे. राज्यात आरक्षणाची मागणी करणारी आंदोलने स्फोटक होत आहेत. त्यामुळे कब है दिवाली? असे म्हणायची वेळ आली आहे.

सर्व ४८ जागा लढवणार

वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असून पक्षाने
तशी तयारी सुरू केली आहे. मी स्वतः अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे आंबेडर यांनी जाहीर केले.

इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत पत्र देऊनही अद्याप उत्तर आलेले नाही.
लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्वच्या
सर्व ४८ जागा लढवणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Sujata Phadnis Passes Away | दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांना मातृशोक, सुजाता फडणीस यांचे निधन