Prakash Ambedkar | ‘शरद पवार आजही भाजपसोबत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) घडताना पाहायला मिळत आहे. नुकतीच राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. परंतु अद्यापही राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने वंचित आघाडीबरोबर जाण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अशातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आजही भाजपबरोबर (BJP) असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, शरद पवार आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सकाळी शपथविधी झाला. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी सांगितले होते की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019 च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं, असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

 

2019 नंतर शरद पवार यांनी भाजप विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला,
यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, के सी आर यांनी देखील हा प्रयोग केला होता.
त्यामध्ये शरद पवार नव्हते. शिवसेनेला भाजपला सोडून बाहेर पडायचं होतं.
सेनेने काही तरी करुन सत्ता आपल्या हातात ठेवली असती, तर सरकार पडलं नसतं.
पण सत्तेची गरज काँग्रेस-राष्ट्रवादीला होती. शिवसेनेला नाही, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

Web Title :- Prakash Ambedkar | ncp leader sharad pawar together with bjp say banchit bahujan aghadi leader prakash ambedkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | PMPML च्या पिंपरी आगारातील बेंच फिटरने बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर, तीन दिवसांत निर्मिती

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा चांगला उपक्रम