प्रकाश आंबेडकर यांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत दंड थोपटले !

मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण ते स्वबऴावर लढणार नाही, तर प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत लढणार आहे.

बिहारच्या वंचित समाजाला राजकारणात उचित स्थान प्राप्त करुन देण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर ट्विटरद्वारे जाहीर केलंय. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर नाही, तर प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत दंड थोपटले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे. ते म्हणतात की ‘बिहारमधील वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत निवडणूक लढवत आहे. आपणाला विनंती आहे की या कार्यात सहकार्य करा,’

शिवसेना बिहारमध्ये 50 जागा लढवणार आहे. मात्र, शिवसेनेला बिहार विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणाऐवजी बिस्किट हे चिन्ह दिले आहे. शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंविरोधात उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. मात्र, पांडे यांना तिकीट मिळालेले नसून, त्यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दिला आहे.

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.