Prakash Ambedkar On Congress And Shivsena | आमच्यासोबत शिवसेना आणि काँग्रेस फिरायला तयार मात्र लग्नाला नाही- प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन –  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्यासोबत काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) फिरायला तयार मात्र लग्नाला तयार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोल्यामधील (Akola) एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहोत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udddhav Thackeray) यांनी भेटीसाठी बोलावलंही होतं. शिवसेनेने भाजपसोबत नात तोडलं आहे तर आम्हाला सोबत घ्यावं. मात्र त्यांची काही हिंमत नाही झाली मला बोलायची. आम्ही आता काँग्रेसलाही युतीचा प्रस्ताव (Alliance proposal) मांडला आहे. त्यांनीच आता ठरवायचं काय करायचं. काँग्रेस आणि शिवसेना आमच्यासोबत फिरायला तयार आहेत मात्र लग्न करायला नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागलेले दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत आता युती नाही. त्यासोबतच काँग्रेसने ही निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना वंचित बहुजन आघाडीला सोबत घेते का ? हा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) आणि मुस्लीम लीग (Muslim League) यांच्यासोबत युती करणार असल्याचं सांगितलं होतं.

Web Title : Prakash Ambedkar On Congress And Shivsena |
no one is ready to alliance with me says prakash ambedkar over shivsena congress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा