Prakash Ambedkar On Porsche Car Accident Pune | बिल्डर अग्रवालची पार्टनरशीप कोण-कोणत्या राजकीय लोकांशी आहे, याची चौकशी व्हावी – प्रकाश आंबेडकर (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Prakash Ambedkar On Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून (Kalyani Nagar Accident) आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणात अजित पवारांनी सुरुवातीला कोणतीही भूमिका न घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उडवण्यात आली. तर आता प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अपघाताच्या रात्री पोलिसांना एका मंत्र्यांचा फोन आला होता असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या तरी मंत्र्याने फोन केला होता, अशी माहिती आमच्या कानावर आली आहे.

विशाल अगरवाल Builder Vishal Agarwal (अल्पवयीन आरोपीचे वडील) या बांधकाम व्यावसायिकाची कोणकोणत्या राजकीय पक्षांबरोबर भागीदारी आहे? कोणकोणत्या मंत्र्यांचे त्याच्या कंपनीत पैसे गुंतलेले आहेत ? कोणकोणत्या नेत्यांबरोबर त्याचे हितसंबंध आहेत ? याची चौकशी व्हायला हवी. ती चौकशी करत असताना अपघाताच्या रात्री त्याने कोणत्या मंत्र्यांना फोन केला होता हे तपासायला हवे ” असे त्यांनी सांगितले.(Prakash Ambedkar On Porsche Car Accident Pune)

ते पुढे म्हणाले ” राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे आणि अशा बऱ्याच अपघातांमध्ये वाहनांचा चालक अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला फारच कमी शिक्षा देण्याचा नियम आता शिथिल करायला हवा. किमान अशा गंभीर अपघातांच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला मोठी शिक्षा व्हायलाच हवी.

पुण्यात जो अपघात झाला ते प्रकरण गंभीर आहे.
प्रसारमाध्यमांना या प्रकरणाचे गांभीर्य समजले असून त्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
परंतु, न्यायालयाने या प्रकरणात अद्याप फारसे गांभीर्य दाखवलेले दिसत नाही. त्यामुळे मी न्यायालयाला विनंती करतो की
हा एक गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे आरोपीविरोधात न्यायालयाने कठोर निर्णय घ्यायला हवेत अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Shrihari Halnor On Dr Ajay Taware | डॉ. अजय तावरेंच्या दबावामुळेच रक्ताचे नमुने बदलल्याचा डॉ. श्रीहरी हळनोरचा खुलासा

Hinjewadi IT Company | हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचे स्थलांतर; शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज

Hamare Baarah | ‘हमारे बारह’ चित्रपटावर वाद, अभिनेत्याला ठार मारण्याची धमकी, अन्नू कपूर म्हणाले – आधी पहा तर…