Prakash Ambedkar on Raj Thackeray | औरंगाबाद संवेदनशील शहर ! ‘राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये’ – प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Prakash Ambdekar on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून (Loudspeaker On Masjid) घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला (MNS Gudi Padwa Sabha) शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Mumbai) आणि दुसरी सभा ही ठाण्यामध्ये घेतली. दोन्ही सभांंमध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला. तर ठाण्यातील (Thane) सभेत भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला. आता राज ठाकरे आपली तिसरी सभा ही औरंगाबादमध्ये (Aurangabad) घेणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (VBA Chief Prakash Ambdekar) यांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. (Prakash Ambedkar on Raj Thackeray)

 

राज ठाकरेंच्या सभेला लहान संघटनांनी विरोध केला असून आम्ही लहान – सहान संघटनांकडे लक्ष देत नाही.
काहीही झालं तरी सभा ही होणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे. दुसरीकडे, औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे.
राज्यातील शांतता बिघडू नये आणि दंगली घडू नयेत म्हणून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये,
असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. (Prakash Ambedkar on Raj Thackeray)

राज ठाकरेंनी आधीच औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे.
मात्र आता संघटनांनी त्यांच्या सभेला विरोध दर्शवला आहे.
अशातच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही विरोध दर्शवल्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार की नाही यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसलेला आहे.
मनसेमधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे, राज ठाकरेंना याचं नुकसान येणाऱ्या महापालिका निवडणुकीत (Municipal elections) होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

Web Title :-  Prakash Ambedkar on Raj Thackeray | Aurangabad is sensitive city mns chief raj thackerays meeting should not be allowed prakash ambedkar demand

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा