मोहन भागवतांकडे AK 47 कशी ? सत्ता आल्यास तुरुंगात टाकणार : प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – बिहारमध्ये एका खासदाराने एके ४७ बाळगल्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले. मोहन भागवत यांच्याकडे देखील एके ४७ आहे. ती त्यांच्याकडे आली कशी ? हे जर ते सांगू शकले नाही तर त्यांना तरुंगात पाठवू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथील मुस्लीम समाज कार्यकर्ता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

संघावर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना दोन दिवसांसाठी तरी तुरुंगात टाकू. सामान्य माणूस आणि आरएसएसच्या लोकांना सारखाच कायदा लागू झाला पाहिजे अशी मागणी करत मोहन भागवत यांच्याकडे एके ४७ कशी आली याचा पुन्हा उल्लेख करत सारखा कायदा लागू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेसवर देखील टीकास्त्र सोडलं. काँग्रेसमध्ये काही लोकांनाच जानवे घालण्याचा अधिकार असून बाकीच्यांना नाही. आपण लोकसभा निवडणुकीत तीन ते चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळी काँग्रेसने हरलेल्या जागा मागितल्या होत्या. मात्र, पक्षाने त्याला नकार देत सेक्युलर मतदान दाबून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

आरोग्यविषयक वृत्त