Prakash Ambedkar | ‘तूर्तास काही घाई नाही…’ ! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चेची बातमी प्रकाश आंबेडकरांनी फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Prakash Ambedkar | शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी नवीन राजकीय रणनीती आखली जात आहे. त्यासाठी आधीच्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकत्र घेण्यासाठी चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंसोबतच युतीचे स्पष्ट संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याचे म्हटले आहे. (Prakash Ambedkar)

त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज बैठक होणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीची माहिती फेटाळून लावली आहे. आमची जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल, तेव्हा सगळ्यांना याची माहिती दिली जाईल, असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, चर्चा सकारात्मक पद्धतीने चालली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती करण्यासाठी बहुजन वंचित आघाडी तयार आहे. आघाडीच्या अधिक तपशिलाबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे ईशान्य भारताच्या भेटीवर होते, रविवारीच मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एकदा युती करण्याबाबत जाहीर घोषणा झाल्यानंतर त्यात कोणतीही लपवाछपवी करण्यात अर्थ नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हटले.

तसेच सध्या कोणतीही निवडणूक नसल्याने युती आघाडीच्या चर्चेची घाई नाही,
जर निवडणूक तोंडावर असती तर तातडीने निर्णय घेण्याचे प्रयत्न केले असते,
त्यामुळे आता वेळ घेत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar denied meeting news with uddhav thackeray for shiv sena vanchit bahujan aghadi alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर

Delnaaz Irani | शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील खंत

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे