Prakash Ambedkar | ‘कसब्यातील विजय धंगेकरांचा’, प्रकाश आंबेडकरांचे मत (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे हेमंत रासने (BJP Hemant Rasane) यांचा पराभव केला. तब्बल तीस वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने (Congress) सत्ता मिळवून इतिहास घडवला. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढतीत अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला. तर राष्ट्रवादीच्या (NCP) नाना काटेंचा (Nana Kate) पराभव झाला. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यामुळे काटेंचा पराभव झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मला असं वाटतं की कसब्यातील विजय हा रवींद्र धंगेकर यांचा आहे, पक्षाचा आहे असे मी मानत नसल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे निवडून आले असते अस का म्हणत नाही. काँग्रेसनं म्हटलं कसबा आम्ही लढवतो, राष्ट्रवादीने म्हटलं चिंचवड आम्ही लढवतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Balasaheb Thackeray Group) काहीच बोलले नाहीत. वंचित आणि त्यांची युती आहे बाकीच्या बद्दल काही बोलणार नाही. भाजपला कसब्यामध्ये मतं कमी झालेली दिसत नाहीत. धंगेकर यांनी चांगली बांधणी केली म्हणून त्यांना अधिक मतं मिळाली, मला असं वटतं की हा विजय रवींद्र धंगेकरांचा आहे.

नामांतराच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, औरंगजेब हे या मातीतले आहेत की नाहीत? तुम्हीच सांगा. ज्याला जाती धर्माचं राजकारण करायचं त्याला करु द्या. लोकच काय ते ठरवतील असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

11 मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) लिखित ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ (Problem of Rupee) या पुस्तकाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त खास कार्यक्रम आम्ही घेत आहोत. वाढती महागाई आणि रुपयाचं अवमूल्यन या विषयावर परिसंवाद घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 100 वर्षापूर्वीच हा प्रॉब्लेम या पुस्तकातून मांडला होता. आजही तोच प्रॉब्लेम आहे. आरबीआय (RBI) आजही त्यावर ठोस उपाययोजना शोधू शकलेली नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Web Title :-  Prakash Ambedkar | prakash ambedkar on defeat of ncp candidate due to vba factor in chinchwad by election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Crime News | ओडिशामधून सांगलीत गांजा तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे पथकाकडून कडक कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime | MSEB मधून बोलत असल्याचे भासवून पावणे दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक, भोसरी मधील प्रकार

Ramdas Kadam | उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा, म्हणाले-‘… तर मानहानीचा दावा ठोकणार’