Prakash Ambedkar | ‘मविआत उद्धव ठाकरे सोडले तर…’, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोडले तर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) हे पक्ष विश्वासर्ह नाहीत असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांच्या तेलंगणातील पार्टीचा महाराष्ट्रात शिरकाव होत असल्याचंही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

 

मविआत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) शिवसेना (Shivsena) फेवरेबल आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी कडून विरोध असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केले आहे. ते रविवारी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रात तेलंगणातील पार्टीचा शिरकाव होत आहे. चंद्रशेखर राव यांच्या बीएसआर पक्षाने (BSR Party) राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या असून आता नागपूरमध्ये सभेची तयारी केली आहे. नऊ वर्ष जनतेच्या मनात राग आहे. तो राग मतात परिवर्तीत करताना मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होत आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सोडले तर दोन पक्षांची काय विश्वासार्हता आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही त्यांच्यासोबत जाणार होतो, परंतु जागावाटपात किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट होत नाही. तिन्ही पक्षांनी त्याचं काय ठरलं ते स्पष्ट करावं.

 

देशात कर्नाटकसारखा निकाल येऊ शकतो

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधताना म्हणाले, भाजप जातीय ध्रवीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुस्लीम समाजाने (Muslim Community) नऊ वर्षे जे सोसले आहे ते आणखीन सहा महिने सोसावं,
जातीय सलोखा बिघडू नये असं काम करावं. देशात कर्नाटकसारखा निकाल (Karnataka Result) येऊ शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

 

हे जातीय तेढ निर्माण करणारे

हिजाब (Hijab), लव्ह जिहाद (Love Jihad) सारखे 12 ते 13 प्रकरणं मागील काही दिवसात काढण्यात आली आहेत.
असे अनेक प्रकार भविष्यात ही केले जातील. हे जातीय तेढ निर्माण करणारे आहेत. मुस्लिम समाजाने नऊ वर्ष हे पाहिलं आहे,
आणखीन सहा-सात महिने पहा. जातीय सलोखा कायम राखला तर देशात कर्नाटकसारखा निकाल लागेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

Web Title :  Prakash Ambedkar | prakash ambedkar on uddhav thackeray and sharad pawar congress loksabha election 2024

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा