Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Prakash Ambedkar | आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक (Kasba and Chinchwad Bypolls) जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी भाजप प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे या दोन्ही मतदारसंघात निवडणुक लढविण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. तर त्यासाठीचे उमेदवार महाविकास आघाडीकडून (MVA) लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटासोबत (Shivsena Thackeray Group) युतीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीची (VBA) भूमिका काय? असा प्रश्न वंचितचे पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना विचारला असता, त्यांनी यावर वंचितची भूमिका स्पष्ट केली.

 

माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आमची शिवसेनेशी युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा (Congress) पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवार जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, जर शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर त्यांना नक्कीच आमचं समर्थन असेल,’ अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली.

तर, ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट प्रयत्नशील असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोनदेखील केला आहे.
यावर प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीमध्ये बिनविरोधी ही संकल्पना नाही.
अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच जर एखाद्या आमदाराचे निधन झाले तर त्याच्याबद्दल सहानुभूती असेल,
याबाबत दुमत नाही. मात्र, तेथील निवडणुक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही.
त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडून द्यावे. या मताचा मी आहे. असेही यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar reaction on byelection in pipari chinchwad and kasbapeth

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास