Prakash Ambedkar | महाविकास आघाडीला धक्का, प्रकाश आंबेडकर म्हणाले, ”…तर लोकसभेच्या ४८ जागा ताकदीनं लढवणार”

मुंबई : Prakash Ambedkar | लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) सगळ्यांनी एकत्र यावे, ही माझी भावना आहे. पण, मला हे शक्य दिसत नाही. उद्या हे एकत्र आले नाही तर आम्हाला लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढवाव्या लागतील. त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केले आहे. साने गुरूजी यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत ते बोलते होते.

आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीबाबत आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इंडिया आघाडीसाठी (India Alliance) धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळाले पाहिजे. यासाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्ये महत्वाची आहेत. अन्य राज्यांत आपल्याला काम करता येणार नाही. पण, महाराष्ट्रात काम करता येईल.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक
असली तरी काँग्रेस (Congress) आणि काही मित्रपक्षांकडून विलंब लावला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष काँग्रेस नेतृत्वाला पत्र पाठवून आणि इतर माध्यमातून
संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

याबाबत दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना
म्हटले होते की, दिल्लीत प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
आंबेडकर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले तर शिंदे, अजित पवार गटातील…, शिवसेनेचा घणाघात

Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी, अजित पवारांची माहिती