Prakash Ambedkar | ‘…म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा’, प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त (Swatantra Veer Savarkar Jayanti) दिल्ली येथील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक खासदार आमदार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांचे पुतळे हटवण्यात आले. यावरुन राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ हे स्वत:ला ओबीसीचे (OBC) नेते म्हणवतात, तर मग त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा (MLA’s Resignation) द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, एक लक्षात घ्या राष्ट्रपतीपदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना हे सरकार डावलतं. त्या अजून जीवंत आहेत, त्यांना हे लोक डवलू शकतात. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला हे डावलू शकतात. तिथे आहिल्यादेवी होळकर किंवा सावित्रीबाई फुले यांच्यासारखी हयात नसलेली माणसं RSS आणि भाजपच्या (BJP) खिजगणतीतच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सदनात जो प्रकार घडला तो काही नवीन नाही.

महाराष्ट्र सदनात घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. कारण महाराष्ट्र सदनात जे घडलं तो ओबीसींचा अपमान आहे. छगन भुजबळ स्वत:ला ओबीसीचे नेते म्हणवतात. तसेच ज्या महाराष्ट्र सदनात हा प्रकार घडला आहे ते सदन भुजबळ यांनीच बांधले आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

रुपाली चाकणकर यांची राज्य सरकारवर टीका

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात घडलेल्या प्रकरावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती.

Advt.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री
सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे,
त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे.
या घडलेल्या प्रकाराची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी,
अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

Web Title : Prakash Ambedkar | prakash ambedkar says chhagan bhujbal should resign ahilyabai savitribai statue removed maharashtra sadan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MHT-CET Result 2023 | येत्या जून महिन्यात होणार MHT-CET चा निकाल जाहीर; रिजल्ट पाहण्यासाठी या स्टेप करा फॉलो

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा खुलासा, म्हणाले-‘…म्हणून शिवतीर्थावर गेलो होतो’ (व्हिडिओ)

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन बनला राज्याचा ‘स्माइल ॲम्बेसेडर’; व्यसनांविरोधात करणार जनजागृती