Prakash Ambedkar | मोदींनी 8 वर्षात देशाची नव्हे ‘गुजरात’ची उभारणी केली, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका, म्हणाले – ‘महाराष्ट्रासह दक्षिणेतील सर्वच राज्य…’

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Prakash Ambedkar | महाराष्ट्रात येणारे मोठे-मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याने विरोधी पक्षांनी मोदी सरकार (Modi Government) आणि भाजपाला (BJP) घेरले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी मोदींवर आरोप करताना म्हटले की, जनतेने नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून दिले. मात्र, आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी गुजरात राष्ट्राची उभारणी केली. ते चंद्रपुरातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, पूर्वी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मेट्रो शहरांमध्येच व्हायचे. आता ते केवळ गुजरातमध्येच होतात. देशातील उद्योजकांवर प्रचंड दबाव असल्याने आज उद्योग गुजरात या एकमेव राज्यात जात आहेत. मोदी व भाजपाकडून ‘एनर्जेटिक’ महाराष्ट्राला ‘डीएनर्जेटिक’ केले जात आहे. या दबावामुळे असंख्य उद्योग कंपन्या देश सोडून जात आहेत.

 

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, देशात काँग्रेस (Congress) तथा इतर पक्षाचे सरकार असताना दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, बंगलोर, चेन्नई, कोलकता या मोठ्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रम व्हायचे. मात्र, आता केवळ गुजरातमध्येच होतात. उद्योगांचेही तेच झाले आहे. राज्यात येणारे उद्योग गुजरात येथे पळवले जात आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे विदर्भातील खनिज संपत्ती गुजरात येथे जात आहे. विदर्भात लोह खनिजासाठी प्रोसेसिंग युनिट सुरू करणे आवश्यक होते. मात्र, ते मुद्दाम सुरू केले नाही.

ते पुढे म्हणाले, भाजपकडे आर्थिक धोरण नसल्यामुळे खनिजाचे महत्त्व कळत नाही. येत्या काळात विदर्भातील खनिज संपत्ती असलेल्या जिल्ह्यांची अवस्था कधीकाळी खनिज संपत्तीत अग्रस्थानी असलेल्या गोव्यासारखी होईल. जपानकडून एक लाख कोटीचे कर्ज घेवून उभारण्यात येत असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पही केवळ गुजरातसाठीच आहे. एकेकाळी ‘बिमारू’ राज्यात उद्योग लावण्यात येत होते. त्यामुळे तेथील गरिबी दूर होत होती. मात्र, आता केवळ गुजरात या एकाच राज्याचा विचार होत असल्याने दक्षिणेतील सर्व राज्य चिंताग्रस्त आहेत. राज्यकर्त्यांचे दबावामुळे असंख्य कंपन्या, उद्योज आज देश सोडून जात आहेत.

 

आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, केवळ खनिज संपत्तीच नाही तर राज्यातील पाणी देखील गुजरातला पाठवण्याची योजना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना तयार केली गेली होती. आताही गोसीखुर्दचे पाणी इतर राज्यात जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा ही ब्लॅक मार्च आहे, ते म्हणाले.

 

आणखी एक आरोप करताना आंबेडकर म्हणाले,
राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
या सर्व निवडणुकांमध्ये झालेला पैशाचा वापर बघता ईडी व आयकर विभागाला
पत्र लिहून भाजप उमेदवारांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

गडकरींवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, टाटा एअर बस प्रकल्प (Tata Air Bus Project)
तथा इतर उद्योगांनाही नागपूर ही सर्वात सोयीस्कर जागा आहे.
मात्र, राज्यातील व विदर्भातील उद्योग गुजरातला पळवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari)
यांनी मिहानच्या माध्यमातून युवकांना दोन लाख नोकर्‍या व अप्रत्यक्ष 3 लाख लोकांना इतर रोजगार देण्याची
घोषणा केली होती. गडकरींचा मिहान प्रकल्प हा शुद्ध फसवणूक आहे.

 

Web Title :- Prakash Ambedkar | progress only gujarat not the country in eight years adv prakash ambedkar criticism

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’