Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी (व्हिडिओ)

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  व्यक्तिगत कारणांसाठी आपण पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिन्यांसाठी दूर राहणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. या तीन महिन्यांच्या काळात पक्षाचे कार्यक्रम सुरु रहावेत यासाठी त्यांनी रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या घोषणेनंतर अनेकांना प्रश्न पडला होता. आता, प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी (Bypass surgery) करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे. prakash ambedkar | prompt issuance bypass surgery and medical bulletin prakash ambedkar vanchit bahujan aghadi

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हेल्थ बुलेटीन जारी

प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: सोशल मीडियावरुन आपण 3 महिन्यांच्या सुट्टीवर जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट ने केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. दरम्यान, आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी हेल्थ बुलेटीन (Health Bulletin) देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज (शुक्रवार) हेल्थ बुलेटीन जाहीर करण्यात आले आहे.

 

आंबेडकर यांच्यावर तातडीची बायपास सर्जरी

प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे, असे मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) सोशल मीडियातून देण्यात येईल, असेही वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी व्हिडिओतून सांगितले आहे.

Web Title :  : prakash ambedkar | prompt issuance bypass surgery and medical bulletin prakash ambedkar vanchit bahujan aghadi

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bhosari MIDC Land Scam | एकनाथ खडसे ED च्या चौकशीला घाबरत नाहीत, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा भाजपला इशारा

MPSC | निवड झालेले अधिकारी उतरले रस्त्यावर, पुण्यात चक्काजाम आंदोलन

Sachin Vaze । CBI नंतर आता ED करणार सचिन वाझेची चौकशी, तळोजा तुरुंगात चौकशी करण्यास कोर्टाची परवानगी