काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवलंय : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – काश्मीर मध्ये गेल्या दोन महिन्यापासुन कलम 144 का लावण्यात आले ? याचा सरकारने खुलासा करावा असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. कलम 144 लावून साठ दिवसापासुन काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवले असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
Prakash Ambedkar

अमित शहा यांच्या कलम 370 आणुन दाखवायच्या आवाहनाला अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पाथरी येथील सभेत उत्तर दिले. ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या 370 आणुन दाखवतो. राफेल विमान खरेदी प्रकरणी तत्कालीन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बोलू द्यावं सत्य बाहेर पडेल. राहुल गांधी यांना कार्ट म्हणावं लागेल असे ते म्हणाले.

भाजप व काँग्रेसवर टिका करताना, हे दोन्ही चोरच आहेत यांच्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना टाळी का दिली ?  हे कळंल का असे उपस्थितांना अ‍ॅड.आंबेडकर यांनी विचारले, पुढे ते म्हणाले मोदी अमेरिकेत गेले तेव्हा ट्रम्प यांना टाळी देऊन आले. त्या टाळीने देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असल्याचे त्यांनी सांगितले

अमेरिका व चीन या दोन्ही देशांदरम्यान तणाव आहे. त्यामुळे चीनच्या बाजारपेठेत अमेरिकेचा कापूस जाणार नाही, अमेरिकेचा कापुस भारतात येणार आहे. त्यामुळे हे धोरण देशातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडणारे आहे असा आरोप त्यांनी केला.

पाथरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विलास बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते सोमवारी (दि.14 ऑक्टोबर) रोजी बोलत होते. यावेळी त्यांनी पाथरी विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विलास बाबर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

वंचितचे उमेदवार विलास बाबर बोलताना म्हणाले, 30 वर्षांत ज्यांनी जिल्हा बरबाद केला. ते आपणास वंचितची उमेदवारी मिळू देणार नाही असे सांगत होते, परंतु तसे झाले नाही. मी 25 वर्षे रस्त्यावर उतरून वेळोवेळी आंदोलने केली. हा संघर्षांचा आवाज सभागृहात पोहचावा यासाठी आपल्या मतांची ताकद वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी करावी. मतदारांना असे आवाहन त्यांनी केले

आलमगीर खान बोलताना म्हणाले, हि विचार धारेची लढाई आहे. आज देशात काॅंग्रेस व राष्ट्रवादीची काय अवस्था झाली आहे. त्यांचे नेते कुठे जात आहेत. वंचित बहुजन आघाडी हि सन्मान व स्वाभिमानाची विचार धारा असल्याचे खान यांनी सांगितले. आवडाजी ढवळे यांनी सुत्र संचालन केले अनेकांनी शेळ्या मेंढ्या सभास्थळी आणून अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी