आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा – काँग्रेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेत्यांच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा तयारीबाबात चर्चा झाली. या चर्चेत ‘काँग्रेस वंचितसोबत जाण्यास तयार आहे मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा’ असं मत काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन त्याचा खूप मोठा फटका काँग्रेस आणि आघाडीला बसला. त्यामुळे यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा आणि बैठका सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.

काँग्रेस वंचितसोबत जाण्यास तयार:

लोकसभेमध्ये झालेल्या झालेल्या चुका टाळून विधानसभेसाठी आघाडीसाठी पुढे गेलं पाहिजे असं काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं मत आहे. मात्र दबावाला बळी पडून आघाडी करू नये असाही एका गटाचा आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची आघाडी करण्याची इच्छा होती मात्र आंबेडकरांनी उगीचच दबावतंत्र अवलंबवत याला योग्य प्रतिसाद दिला नाही असे या नेत्यांचं म्हणणं आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसने हात पुढे केला आहे. आंबेडकर त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा आणि दीर्घकालीन परिणाम करील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

काँग्रेस आमदारांची मात्र बैठकांना दांडी ; नेत्यांच्या चिंतेत वाढ

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे इत्यादी दिग्गज नेते गेली दोन दिवस महाराष्ट्रात अनेक बैठका, चर्चा घेऊन विधानसभेची रणनीती तयार करण्यासाठी चाचपणी करत आहेत. मात्र काँग्रेसच्या अनेक आमदारांनी या बैठकांना हजेरी लावलेली नाही. या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सतेज पाटील, भारत भालके, विश्वजित कदम,संजय निरूपम इत्यादी चा समावेश आहे. यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता मात्र वाढली आहे. या आमदारांची नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांना एकसंध कसे ठेवायचे असा मोठा प्रश्न काँग्रेसच्या बड्या नेत्यांना पडला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग येत असून सर्वच पक्षांच्या बैठका आणि चर्चां मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

सिनेजगत

‘या’ अभिनेत्याच लग्न होत, त्याच दिवशी वडिलांचं झालं होतं निधन

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’, बॉयफ्रेंडने केलं ‘ब्रेकअप’

पूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

 

You might also like