‘जो व्यक्ती स्वता:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार’ : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या रणधुमाळीत उमेदवार एकमेकांवर टीका करत असतात. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष केलं आहे. त्यात त्यांनी वैयक्तीक पातळीवर टीका केली आहे. ‘जो व्यक्ती स्वता:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार’ अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भंडाऱ्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कारू नान्हे यांच्या प्रचाराकरीता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आंबेडकरांनी सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी मोदींसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावरही टीका केली.

‘जो व्यक्ती स्वता:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार’, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर टीका केली. तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार लढविल्याने प्रफुल पटेल आणि शरद पवार यांनी स्वत: निवडणूक लढविली नाही, असं म्हणत शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली.

दरम्यान, सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे उभे आहेत. त्यांना सोलापूरात भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. आपण सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे सोलापूरात सुशील कुमार शिंदे आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे.