Prakash Ambedkar | राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यामुळे राज्यात सध्या शिवशक्ती-भीमशक्ती युतीची चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात ठाकरे – आंबेडकर एकत्र येणार का, याची सर्वांना उत्सुक्ता आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यावर स्पष्ट भाष्य केले आहे.

 

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी आंबेडकर म्हणाले, आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही युतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अधिकृतरित्या दोनही पक्षांकडून आम्हाला अद्याप काही कळवले गेले नाही. उद्धव ठाकरेंसोबत जो कार्यक्रम झाला तो अराजकीय होता. त्यात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. आम्हाला सोबत घ्यायचे की नाही, हे त्यांनी ठरवून आम्हाला सांगावे. आम्ही ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप आम्हाला कळला नाही. त्यामुळे जो पर्यंत ते आम्हाला कळवत नाहीत, तोपर्यंत नवीन समीकरणे उभी राहणार नाहीत. आम्ही अद्यापतरी प्रतीक्षेत आहोत. काँग्रेस आणि ठाकरे गटाने मिळून आम्हाला प्रस्ताव दिला, तरी आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार का, हे अद्यापतरी गुलदस्त्यात आहे.
मागील कार्यक्रमात यावर भूमिका जाहीर करण्यात येईल, अशी आशा सर्वांना होती. पण त्यावेळी तसे काही झाले नाही.
शिवसेना प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाला वेळ लावत आहे.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना ग्रामपंचायत निवडणुका एकट्याने लढण्याशिवाय आता पर्याय नाही.
पण, आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आणि विधानसभेला कदाचित ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Prakash Ambedkar | until then the new equation cannot stand big statement of prakash ambedkar about shivsena congress alliance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

Mahavitaran Employee – Court News | वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस 3 वर्षे सश्रम कारावास