Prakash Ambedkar | आम्ही युतीसंदर्भात ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत – प्रकाश आंबेडकर

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत, अंधेरी येथील पोटनिवडणुकीवर (Andheri By Election) भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) युतीवर देखील ताशेरे ओढले. भाजपला (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील नको आहेत. ज्याप्रमाणे त्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नको होते. त्याचप्रमाणे त्याना एकनाथ शिंदेंना देखील बाजूला काढायचे आहे, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.
आम्ही काँग्रेस (Indian National Congress) आणि शिवसेनेला (Shivsena) आगामी निवडणुकांसाठी युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. अद्याप दोनही पक्षांकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता आम्ही थांबा आणि पहाच्या (Wait and Watch) भूमिकेत आहोत. अंधेरी येथील पोटनिवडणूक दोनही शिवसेना पक्षांच्या दृष्टीकोनातून म्हत्वाची आहे. आम्ही या निवडणुकीत कोणाल पाठिंबा द्यायचा याबद्दल अजून काही ठरले नाही. भाजपचा उमेदवार देखील या निवडणुकीत उभा आहे. आणि त्याल आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. महाविकास आघाडीकडून आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कामकाजावर बोट ठेवले.
सर्वोच्च न्यायालयाने आयोगाल अनियंत्रित अधिकार दिले, तर काय होऊ शकते, याची जंत्री मी मागे सांगितली आहे.
आगामी काळात ज्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत,
त्यात शिंदे आणि भाजपची युती होते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
एसटीच्या लुटीच्या संदर्भात एसटीचे अधिकारी कर्मचारी बोलत नाहीत. त्यामुळे ते सुद्धा यात चोर आहेत, असे मला वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Web Title :- Prakash Ambedkar | We in ‘wait and watch’ role regarding alliance – Prakash Ambedkar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…
Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी
Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर