हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना विसरली : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CAA, NRC संदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राटही म्हणत नाही आणि त्यांचे विचारही विसरल्याचा आरोप जावडेकरांनी केला आहे. देशभरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर CAA, NRC बाबत योग्य संदेश पोहोचवण्यात सरकार कमी पडल्याची कबुली जावडेकर यांनी दिली. एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जावडेकर बोलत होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत होते निर्वासीतांना शरण देऊ आणि घुसखोऱांना हाकलून देऊ. पण शिवसेनेने सध्या आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळे ते आता बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणत नाहीत. बाळासाहेबांचे बांगलादेशवासी आणि घुसखोरांविषयीचे विचारही शिवसेना विसरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर CAA, NRC कायदा आल्यानंतर तो लोकांपर्य़ंत पोहचवण्यास सरकार कमी पडले. हा कायदा पास झाल्यानंतर लोकाशी आमचा योग्य संवाद झाला नाही. याचाच फायदा घेत काँग्रेससह विरोधक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. मात्र आम्ही गावागावत जाऊन या कायद्याविषयी जनजगृती करणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

देशात CAA, NRC विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधक काँग्रेसने मुंबईत CAA, NRC कायद्याविरोधात शांती मोर्चा काढला. गवलिया टँकजवळ तेजपाल हॉल ते गिरगाव चौपाटीपर्य़ंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मोर्चात सहभागी झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/