प्रकाश जावडेकरांच्या वक्तव्याचा शिक्षक संघटनांकडून निषेध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सरकारकडे शाळांनी भीक न मागता माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक मदत मागावी, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचा शिक्षक संघटनांनी निषेध केला आहे.

जनप्रबोधिनी आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात जावडेकर यांनी अनुदान मागणाऱ्या शाळांना संबोधित करताना हे वक्तव्य केले होते. मात्र विरोधी पक्षात असताना याच मुद्द्यावर भाजपाने शिक्षकांना आश्वासन दिले होते. त्यामुळे मतांसाठी खोटी आश्वासने देत अशी वक्तव्ये करणाऱ्या जावेडकर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

[amazon_link asins=’B078GT7VSW,B077LPZ16H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56e7044e-b976-11e8-99ab-2b44f709b642′]

शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले की, विरोधी पक्षात असताना स्वत: प्रकाश जावडेकर यांनी शाळांना अनुदान व शिक्षकांना वेतन मिळावे, यासाठी शिक्षक व शाळांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. विनाअनुदान शाळा चालविणे कठीण बाब आहे, म्हणून सत्तेवर आल्यास भाजपा १०० टक्के अनुदान देईल, असे आश्वासनही त्यांनी आंदोलकांना दिले होते. उपाशीपोटी क्रांती होऊ शकत नाही, मग चांगले अध्यापन कसे होणार, असा सवाल उपस्थित करत भाजपा शिक्षकांना उपाशीपोटी ठेवणार नाही, असे जावडेकर यांनी भाषणात सांगितले होते. मात्र सत्ता येताच त्यांना या भाषणाचा आणि आश्वासनांचा विसर पडल्याची टीका पाटील यांनी केली आहे. भीक मागू नये, अशी विधाने करून ते त्यांच्या शिक्षण देण्याचा मुख्य जबाबदारीला झटकत असल्याचा आरोप काँग्रेसच्या शिक्षक सेलने केला आहे.

शिक्षकाकडून पाच वर्षात दाम दुप्पटच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक

सर्वच ठिकाणी सक्षम विद्यार्थी नसतात. विद्यार्थी त्यांच्या मनाने आपले कर्तव्य समजून शाळेला सहकार्य करीतच असतात. शासन म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही, असा सवाल शिक्षक महादेव सुळे यांनी केला आहे. सरकार अनुदान देते म्हणजे भीक देत नाही. वेतनेतर अनुदानाअभावी शाळेचे, वेतनाअभावी शिक्षकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सल्ले देण्याऐवजी आवश्यक मदत करण्याचे आवाहनही सुळे यांनी केले.

शाळा विद्यार्थ्यांसाठी मागते ती भीक नसते. चांगले करण्याची धडपड असते, असे सांगत जुनी पेन्शन हक्क संघटनेने जावडेकर यांचा विरोध केला. त्यांनी तोंडाला लगाम घालावा, असे संपर्क प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील यांनी सांगितले.