मुख्यमंत्र्यांच्या चेहर्‍या ‘विना’ दिल्लीत उतरणार दिल्लीमध्ये BJP, अशी ‘रणनीती’ असल्याचं जावडेकरांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारची बाजू मांडली. जेएनयूमध्ये दीपिका पादुकोनच्या जाण्याने सोशल मीडियावर बॉयकाट छपाक मोहिमेवर प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की भाजप आणि मोदी सरकार कोणत्याही व्यक्ती विरोधात बॉयकाट अभियान चालवण्यावर विश्वास ठेवत नाही.

जेएनयूमध्ये हिंसेची सुरुवात डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांकडून –
भाजप नेत्यांकडून दीपिकावर होत असलेल्या टीकेवर बोलताना जावडेकर म्हणाले की जर लोकांना काहीही बोलण्याचा आधिकार असेल तर नेत्यांना देखील आपले मत मांडण्याचा आधिकार आहे. जेएनयूमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की जेएनयूमध्ये हिंसेची सुरुवात डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांनी केली. तपासानंतर हे स्पष्ट होईलच की जेएनयूमधील हिंसेमध्ये कोणाचा हात आहे.

जेएनयू जमाव गोळा झाल्या होता तेव्हा दिल्ली पोलिसांनी कोणतीही अॅक्शन न घेतल्याच्या मुद्द्यावर बोलताना जावडेकर म्हणाले की या प्रकरणात दोन प्रकारचे मानक नसू शकतात. जामियात पोलिसांवर परवानगीशिवाय घुसरल्याचा आरोप लावण्यात आला आणि जेव्हा जेएनयूमध्ये पोलीस विद्यापीठाच्या आवारात गेले नाहीत तेव्हा त्यांच्यावर कॅप्मसमध्ये न घुसण्याचा आरोप लावण्यात आला. पोलिसांकडे असे करण्याची परवानगी नव्हती.

सरकार विरोधात असंतोष नाही –
जावडेकर म्हणाले की देशात सरकार विरोधात असंतोष नाही. चूकीची माहिती पसरवून अशांती पसरवण्याचा प्रकार घडत आहे. उलट सरकारच्या समर्थनात जास्त मोर्चे निघत आहेत.

काश्मीर मुद्द्यावर जावडेकर –
कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये शांततेचा माहोल आहे आणि दहशतवादी करावायांमध्ये कमी आली आहे. जम्मू काश्मीरचे 3 माजी मुख्यमंत्र्यांना मुक्त करण्याचा निर्णय प्रशासकीय निर्णय आहे. काश्मीरमध्ये कोणत्याही नागरिकाच्या मौलिक अधिकाराचे कोणतेही उल्लंघन झाली.

जावडेकरांनी सांगितली दिल्ली निवडणूकीची रणनिती –
दिल्ली निवडणूकीबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की सीएए, एनपीआर आणि एनआरसी दिल्ली निवडणूकीचे मुद्दे नाहीत. केजरीवाल यांच्या विरोधात भाजपकडे चेहरा नसल्याचे सांगताना ते म्हणाले की काही राज्यात असे होते. काही राज्यात नेते बनवले जातात तर काही राज्यात नाही. आपकडे देखील केजरीवाल यांच्याशिवाय कोणताही दुसरा चेहरा नाही.

जावडेकर पुढे म्हणाले की पीएम मोदी देशाचे विश्वसनीय नेता आहेत आणि दिल्लीत ते निवडणूकीचे कॅप्मेन करतील. दिल्लीत सीएम चेहऱ्याशिवाय मैदानात उतरण्याची आमची आमची रणनीति आहे. अनेक राज्यात भाजप कोणत्याही नेत्याशिवाय निवडणूकीला सामोरी गेली आहे.

जावडेकरांची केजरीवाल यांच्यावर टीका –
ओपिनियन पोल्सवर बोलताना जावडेकर म्हणाले की चांगल्या जाहिराती म्हणजे चांगले नेतृत्व नाही. मागील वेळी आप आण्णा हजारेंच्या लाटेमुळे जिंकून आली. ज्यानंतर केजरीवाल यांनी आण्णा हजारे यांनी बाहेर केले. केंद्र सरकारने दिल्लीत बरीच कामे केली आहेत आणि केजरीवाल त्याच्या जाहिराती करत आहेत.

केजरीवाल यांची सवय आहे की काम केंद्र सरकारचे असते आणि टोपी ते घालतात. काम आम्ही करतो आणि क्रेडिट केजरीवाल घेतात. राहुल गांधींनी जेएनयू वादावर फॅसीजमची टीका केली होती त्यावर जावडेकर म्हणाले की राहुल गांधी यांची एक समस्या आहे की त्यांना फक्त काही शब्दच माहित आहेत ज्याचा ते वापर करतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/