मुंबई भाजपमधील गटबाजी उघड, प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी पराग शाहांची गाडीच फोडली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत रंगत येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने बंडाचा झेंडा उगारला असून विरोधी पक्षांकडे जाण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर काही जणांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे.

त्यानंतर आता घाटकोकोपरमध्ये देखील बंडाचे निशाण फडकावले गेले असून तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला आहे. या ठिकाणी तिकीट देण्यात आलेल्या पराग शहा यांच्या गाडीची मेहता यांच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. भाजपने चौथी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर यामध्ये प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करण्यात आला.

त्यानंतर मेहतांची सदिच्छा भेट घेण्यासाठी पराग शहा आले असता मेहतांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड करत फॉर्म भरायला जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर प्रकाश मेहता आणि किरिट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत कार्यकर्त्यांना शांत केले.
Prakash Mehta
दरम्यान, भाजपने या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज आमदारांचे आणि नेत्यांचे तिकीट कापले असून सर्वांसाठीच हा धक्का मानला जात आहे. त्यामुळेच पाचवेळा घाटकोपरमधून आमदार झालेल्या मेहता यांचे तिकीट कापल्याने कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला आहे.

visit : Policenama.com