प्रकाश मुत्याल पिंपरी चिंचवडचे पाहिले सह पोलीस आयुक्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विशेष पोलीस महानिरीक्षक आणि राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी प्रकाश प्रभाकरराव मुत्याल यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त (प्रशासन) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकाश मुत्याल यांनी यापूर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण येथे काम केले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात त्यांनी अपर पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यावेळी त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड परिसराची जबाबदारी होती.

प्रकाश मुत्याल हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी निवृत्त होणार आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक आणि रस्ते परिवहन महामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी हे पद पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत सह पोलीस आयुक्त (प्रशासन) असे करण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अपर पोलीस आयुक्त प्रशासन हे पद तात्पुरते अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) या पदामध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रुपांतरीत करण्यात येत आहे.