‘ते’ दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक ! म्हणाले – ‘याला म्हणतात खरा स्वाभिमान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची भेट घेतली. यासाठी 8 तास विज्ञान भवनात बैठक सुरू होती. परंतु ही बैठक निष्फळ ठरली. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) हे देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी जेवणाच्या वेळी शतेकऱ्यांनी मात्र सरकारचं जेवणं नाकारलं. आम्ही सरकारी जेवण किंवा चहा स्विकारणार नाही. आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे अशी भूमिका चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी घेतली होती. अभिनेते प्रकाश राज यांनी आता शेतकऱ्यांच्या या भूमिकेचं कौतुक केलं आहे. याला म्हणतात खरा स्वाभिमान असं म्हणत त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

प्रकाश राज यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

गुरुवारी (दि 3 डिसेंबर रोजी) कृषी कायद्यावरील 39 आक्षेप शेतकरी नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडले. यापैकी 8 आक्षेप असे होते ज्यावर पुनर्विचार आणि दुरुस्ती करण्याची तयारी मंत्र्यांनी दाखवली. इतकंच नाही तर शेतकऱ्यांचे आक्षेप मान्य असतील तर कायदे रद्द करवेत अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली.