‘अब की बार जनता की सरकार…’ नारा देत ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता लोकसभेच्या रिंगणात

बंगळूरू : वृत्तसंस्था – ‘अब की बार जनता की सरकार…’ असा नारा देत निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे दाक्षिणात्य व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनी बंगळूरू लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रकाश राज यांनी नववर्षात आपल्या राजकिय प्रवेशाची घोषणा केली होती.

केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. गौरी लंकेश हत्येनंतरही त्यांनी सरकारवर टीकेचे हत्यार उपसले होते.

ही वेळ जनतेसाठी काही तरी करून दाखविण्याची आहे. यासाठी मला तुमच्या पाठींब्याची गरज आहे. असं म्हणत ‘अब की बार जनता की सरकार…’ हा नारा देत त्यांनी आपल्या राजकिय प्रवेशाची जानेवारीत घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी काल (२२ मार्च) ट्विरटरवरून आपण लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही जाहीर केले होते. कमल हसन, रजनीकांत नंतर राजकिय क्षेत्रात प्रवेश करणारे दाक्षिणात्य अभिनेते आहेत. ते बंगळूरूमध्ये भाजपच्या पी. सी. मोहन यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत.