अभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड आणि साउथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांना कोण ओळखत नाही. त्याने अभिनयाने चाहत्यांवर आपली छाप अशी टाकली आहे. त्यामुळे त्याला कोणी विसरु शकत नाही. प्रकाश राज हा अभिनेता सोशल मिडियावर एकदम स्पष्ट बोलणारा अभिनेता आहे. यामुळे त्याला अनेक वेळा युजर्सच्या ट्रोलचा सामना करावा लागला आहे.

प्रकाश राजने ट्विटरवर एक असा किस्सा शेअर केला आहे आणि सांगितले की, मोदी विरोधमुळे चाहत्यांना ही अपमान सहन करावा लागला. प्रकाश राजने एका महिलेचा किस्सा सांगितला. एका महिलेला माझ्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा होती पण तिच्या पतीने सगळ्यांसमोर तिचा अपमान केला. याबाबतची घटनेची सविस्तर माहिती प्रकाश राजने पोस्ट मध्ये लिहली आहे. आपण ते सविस्तर जाणून घेऊया…

प्रकाश राजने ट्विटरवर लिहले की, ‘कश्मिरच्या गुलमर्गमध्ये मी हॉटेलमधून बाहेर पडलाे होतो, तेव्हा एक महिला माझ्याजवळ आपल्या मुलीला घेऊन आली आणि म्हणाली की, मला तुमच्यासोबत सेल्फी काढायचा आहे. मी होकार दिला. त्याच दरम्यान तिचा पती तिथे आला आणि त्या फोटोला डिलीट करण्यास सांगितले. कारण माझे मोदीबाबत वेगळे विचार आहे. म्हणून त्याने तिचा अपमान केला.’

प्रकाश राजने पुढे लिहले की, ‘अपमानामुळे त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आले. मी त्या महिलेच्या पतीला म्हणालो की, डिअर सर मिस्टर मोदी असो किंवा मी आम्ही दोघे ही तुमच्या लग्नाला आलो नाही. ज्यामुळे तुम्ही इतके चिडला आहात आणि तुम्हाला इतकी छान मुलगी व बायको आहे. जे तुमच्यासोबत चांगले जीवन जगत आहे. त्यांचा आदर करा. आपल्या सुट्ट्या चांगल्या एन्जॉय करा, असे सांगितल्यानंतर त्या पुरुषाकडे याचे काहीच उत्तर नव्हते. तो शांत उभा होता. तेवढे सांगून मी निघून गेलो. मला माहित नाही की, त्या पुरुषाने माझा फोटो डिलीट केला की नाही पण त्या महिलेच्या मनातील दुःख तो भरुन काढू शकेल का ?
प्रकाश राज हे लोकसभेच्या निवडणूकीमध्ये अपक्ष उमेद्वार म्हणून उभे होते. पण त्यांना पराजयाचा सामना करावा लागला.

सिनेजगत

अभिनेत्री प्रियंका चोपडाचा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘शिळ्या कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

 

Loading...
You might also like