‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडं’, ‘या’ अभिनेत्याचा भाजपवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी करुन राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा पेच सुटला असून उद्या महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

सुप्रीम कोर्टाने भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील 80 तासांचे फडणवीस सरकार-2 कोसळले. मागील चार दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींवर सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यात सोशल मीडियात सुद्धा अग्रेसर आहे. विशेष म्हणजे, दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियात राज्यातील राजकीय घडामोडींवर ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे.

प्रकाश राज यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. यामध्ये #Mahashame ज्यांना नाचता येत नाही ते डान्स फ्लोअरला नावे ठेवत नाचणे बंद करतात, असे म्हणत प्रकाश राज यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच याआधी त्यांनी सतत महाराष्ट्राच्या राजकारणावर ट्विट केले आहे. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याने अनेक राज्यातील नेते आणि राज्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

Visit : Policenama.com