मोदींच्या भावाची भविष्यवाणी ; नरेंद्र मोदींच होणार पुन्हा पंतप्रधान  

मंगळुरु : वृत्तसंस्था – आगामी निवडणुकीत कोणाची सत्ता येणार आणि कोण पंतप्रधान होणार याच्या चर्चा सुरुच असतात. अनेकांनी याबद्दल भविष्यवाणी वर्तवली आहे. अनेकांना आपापल्या परीने यावर उत्तर दिली आहेत. याच प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असतात, मात्र त्यांचा स्वतःचा भाऊ प्रल्हाद मोदी यांनी यावर भविष्यवाणी केली आहे. तसंच प्रल्हाद यांनी सध्याची राजकीय स्थिती, देशभरात भाजपबाबत तयार होत असलेलं मत, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची सक्रीय राजकारणातील एण्ट्री याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. ते मंगळूर येथे बोलत होते.

भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागा जिंकतील. तसंच नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा विश्वास प्रल्हाद मोदी यांनी व्यक्त केला आहे. मला विश्वास आहे की आगामी निवडणूक ही २०१४ ची पुनरावृत्ती ठरेल. भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील. तसंच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा मिळेल, असं प्रल्हाद यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदींनी गेल्या साडेचार वर्षात देशभरात विविध विकासकामांची अंमलबजावणी केली आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केले.

दरम्यान, प्रल्हाद मोदी यांना प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रिय सहभागावर विचारलं असता. त्यावर प्रियंका गांधी यांच्या एण्ट्रीने काँग्रेसला निवडणुकीत फायदा होणार नाही, असं वक्तव्य केले.