Pramod Nana Bhangire-Kondhwa Dafanbhumi | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या इशार्‍या नंतर कोंढवा येथील दफनभूमीचा प्रस्ताव अखेर पुणे महानगरपालिकेकडून रद्द !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pramod Nana Bhangire-Kondhwa Dafanbhumi | कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) परिसरातील साधारणतः १० ते १५ हजार हिंदू लोकवस्ती असलेल्या सर्वे नं ४४ या भागात, लहान मुलांच्या खेळासाठी असलेले फुटबॉलच्या मैदानासाठी महानगरपालिकेने Pune Municipal Corporation (PMC) काही दिवसांपूर्वी ४५ लाख रुपयांचा निधी मंजुर करून दिला होता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेकडे संबंधित ठिकाणी मुस्लिम समाजाची दफनभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र कायद्यानुसार भर लोकवस्तीच्या ठिकाणी कोणतीही दफनभूमी किंवा स्मशानभूमी करता येऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी संबंधित जागेवरील दफन भूमी रद्द करण्याबाबत, महानगरपालिकेकडे निवेदन देत दफनभूमी प्रस्ताव रद्द केला नाही तर शिवसेना स्टाईलने महानगरपालिमध्ये आंदोलन करू,असा इशारा देखील दिला होता. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने या निर्णयाबाबत सकारात्मक पाऊले उचलत, संबंधित ठिकाणी होऊ पाहणाऱ्या दफनभूमीचा निर्णय मागे घेतला आहे. (Pramod Nana Bhangire-Kondhwa Dafanbhumi)

कोंढवा हे सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा परिसर असलेला परिचित आहे. मात्र कोंढव्यात जिथे हिंदू नागरिकांची दाट लोकवस्ती आहे. त्या भर लोकवस्तीत मुस्लिम समाजाचे दफनभूमी बांधण्यात येणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,महत्वाचे म्हणजे, स्मशानभूमी किंवा दफनभूमी ही लोकवस्तीच्या बाहेर असावी, हे सर्वज्ञात असताना देखील, याठिकाणी दफनभूमी करण्यासाठी स्थानिक माजी आणि आजी लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे तशी विनंती केली होती. तशा मथळ्याचे त्यांनी पत्र लिहून आयुक्तांनसमोर सादरही केले होते. (Pramod Nana Bhangire-Kondhwa Dafanbhumi)

त्यांनतर कोंढव्यातील हिंदू लोकवस्तीमध्ये असलेल्या या लहान मुलांचे क्रीडांगणाचे दफनभूमीत रूपांतर करू नये.
यासाठी कुमार पृथ्वी सोसायटी, जितो सोसायटी, रविराज कोलोराडो, वर्धमान सोसायटी, इशापर्ल सोसायटी,
काकडे वस्ती आणि साईबाबा नगर येथील नागरिकांनी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरेंची भेट घेतली
त्यानंतर प्रमोद नाना भानगिरे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन जागेची पहाणी केली व पुणे महानगरपालिकेकडे यासंबंधी
भर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी दफनभूमी प्रस्ताव रद्द करण्यासाठी निवेदन दिल्या नंतर दफनभूमी प्रस्तावावर कारवाई
न झाल्यामुळे मागील दोन दिवसांपूर्वी नानांनी महानगरपालिकेला दफनभूमी रद्द न केल्यास प्रखर आंदोलन करण्याचा
इशारा दिला होता.

यावर महानगरपालिकेने सकारात्मक पाऊले उचलत, लगेच दफनभूमीचा निर्णय मागे घेऊन, लहान मुलांसाठी असणारे
क्रीडांगण हे त्यांच्यासाठीच खुले राहील असे जाहीर आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dark Underarms Home Remedies | Dark Underarms मुळे लग्नात स्लीव्हजलेस घालणे होते कठीण, जाणून घ्या कसा दूर होईल अंडरआर्म्सचा काळेपणा…

Pune Pimpri Chinchwad Crime News | वाइन शॉपमध्ये चोरी, रोख रक्कम, दारुचे बॉक्स लंपास

Room Heater Side Effects | हिवाळ्यात रूम हीटर वापरा जपून, नाहीतर एका चूकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव…