Pramod Nana Bhangire | शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरेंच्या वतीने कर्णबधिर मुलीच्या कानाच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pramod Nana Bhangire | शिवसेना प्रवक्ता (Shiv Sena spokesperson) माजी आमदार नरेश म्हस्के (Former MLA Naresh Mhaske) यांच्या वाढदिवसांनिमित्त शिवसेना पुणे शहरप्रमुख (Shiv Sena Pune City Chief) नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांच्याकडून कर्णबधिर मुलीच्या कानाच्या ऑपरेशनसाठी 6.25 लाख रुपयांचा मदतनिधी, अनाथ बालकांना स्नेहभोजन, निराधार वृद्ध महिलांना किराणा धान्याचे वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त रोहन खैरे या कष्टकरी नागरिकाच्या 4 वर्षांच्या जन्मतः कर्णबधिर मुलीला कानाच्या ऑपरेशनसाठी 6.25 लाख रुपयांचा निधी म्हस्के याच्या हस्ते दिला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Chief Minister’s Relief Fund) 2 लाख रुपयांचा निधी नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी मिळवून दिला. याबद्दल रोहन खैरे यांच्या कुटुंबीयांनी नाना भानगिरे यांचे भावनिक होत आभार मानले. नरेश म्हस्के यांनी नाना भानगिरे यांचे वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.

 

शंभूराजे अनाथालयात केक कापून आणि बालकांना मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.24) संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उपशहर प्रमुख संतोष रजपूत, पुणे शहर युवा सेना उपशहरप्रमुख काका पवार, विधानसभा युवा अध्यक्ष योगेश जोशी, पुणे शहर महिला आघाडी उपसंघटिका अयोध्या आंधळे, सारिका पवार, प्रभाग अध्यक्ष राजू ढेबे, बबन आंधळे, विभाग अध्यक्ष सचिन तरवडे, राजू काळे, उद्योगपती सचिन भानगिरे, बारवकर काका, अक्षय तारू आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

मातोश्री हौसाबाई निराधार वृद्ध महिला आश्रमात शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या वतीने नरेश म्हस्के
यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिना पुरेल इतका किराणा, धान्य आश्रमाच्या अध्यक्षा आरपीआय पुणे शहर
महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे आणि मराठी पत्रकार संघ शहर अध्यक्ष राकेश
यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
नगरसेवक मारुती आबा तुपे, आरपीआय शहर अध्यक्षा शशिकला वाघमारे आणि शिवसेना नेत्यांनी नाना भानगिरे
यांचे अभिनंदन करत नरेश म्हस्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमित दाभाडे, अमोल जगताप, राजू गवळी, गणेश साळुंके आणि नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title :- Pramod Nana Bhangire | Shiv Sena Pune City Chief Nana Bhangire financial assistance for deaf girl’s ear surgery

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले- ‘एका अहंकारी व्यक्तीमुळे मुंबईचा…’

Majestic Aamdar Niwas | ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन