माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर, अफवा न पसरवण्याचं आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे मात्र स्थिर आहे. या दरम्यान त्यांच्या मृत्यूविषयी अफवा पसरत आहेत. यावर त्यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पण फेक न्यूज पसरवू नका असे आवाहन केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलगी शर्मष्ठा यांनी सांगितले की, वडिलांची प्रकृती चिंताजनक जरी असली तरी कृपया खोट्या बातम्या पसरवू नका आणि मला फोन देखील करू नका. कारण हॉस्पिटलच्या अपडेट मिळण्यासाठी मला माझा फोन फ्री ठेवावा लागत आहे.

शर्मिष्ठा यांनी काल एक ट्वीट केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, गेल्या वर्षी 8 ऑगस्टला माझ्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. बरोबर एक वर्षाने 10 ऑगस्टला त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांच्यासाठी जे योग्य आहे तेच देवाने करावे, त्याचबरोबर मला दुःख आणि आनंद समान पद्धतीने स्वीकारण्याची ताकद द्यावी. मी सर्वांचे आभार मानते असे म्हटले आहे.

https://twitter.com/ABHIJIT_LS/status/1293756212861734912