‘प्राणायम’ आणि ‘जलनेती’नं वाढेल इन्युनिटी, सर्दीमध्ये हल्दीचा उपयोग करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम

प्रश्न –  रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात कोणते उपाय आहेत. कोणत्या योगामुळे फायदा होईल ?

उत्तर –  रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य दिनक्रमाबरोबर चांगला आहार देखील गरजेचा आहे. व्हिटॅमिन सी सोबत टरबूज, खरबूज, हंगामी फळे व भाज्या खाव्यात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. योग्य वेळी झोपणे आणि लवकर उठणे तसेच दररोज योग – व्यायाम आवश्यक आहे. प्राणायाम आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे फुफ्फुस देखील मजबूत होतात. जलनेतीमुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. ही आपल्या श्वसनमार्गाची श्वसन क्षमता वाढवते.

प्रश्न –  सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. ही समस्या रोखण्याचा आयुर्वेदिक उपाय कोणता आहे?

उत्तर – अर्धा चमचा हळद पाण्यात उकळवा आणि सकाळी आणि सायंकाळी वाफ घ्या. एक लहान हिरडा, एक चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा ओवा या सर्वांची पावडर बनवा. ती कोमट पाण्यात दिवसातून ३ -४ वेळा सेवन करा. आहारात आले आणि हळदीचा जास्त वापर करावा. थंड आणि आंबट गोष्टी टाळाव्यात. एसी, कूलरसमोर झोपू नये. कोमट पाणी प्यावे तसेच कोमट पाण्याने अंघोळ करावी. अ‍ॅलर्जीयुक्त गोष्टी टाळा. औषधांमध्ये चित्रक हरितकी, लक्ष्मी विलास रस आणि दशमूल कटूत्रे यांचा काढा पिऊ शकतो.