विजयाच्या हॅट्रिकसाठी प्रणिती शिंदेंना शिवसेनेसह MIM चं कडवं ‘आव्हान’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. मात्र यावेळी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी प्रणिती शिंदेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे मात्र विरोधात असलेल्या शिवसेनेसमोर उमेदवारीबाबत मोठा संभ्रम दिसून येतो. कारण युती झाली तर हा मतदासंघ सेनेच्या वाट्याला येणार आहे. गेल्या वेळेस शिवसेनेने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महेश कोठे यांना उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेनेपेक्षा प्रणिती शिंदे यांना एम आय एमचे मोठे आव्हान आहे कारण गेल्या वेळेस एम आय एमच्या तौफिक शेख यांनी कडवी झुंज दिली होती.

त्याचप्रमाणे सोलापुरातून माकपने आणि वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रणिती शिंदे यांना यावेळी विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी देखील शिवसेना काँग्रेसचाच उमेदवार शिंदे यांच्यासमोर देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. नुकताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणूक होताच प्रणिती शिंदे यांनी आपल्या विधासभेची तयारी सुरु केली होती मात्र हॅट्रिक विजयासाठी यावेळी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. बाकी पक्षांचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत मात्र शिवसेनेच्या उमेदवारीकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.