प्रणिती सुशिलकुमार शिंदेंची मंत्रिमंडळात ‘वर्णी’ ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबरला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मुंबईतून बोलावणं आले आहे. प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रणिती शिंदे या सध्या सोलापूरमध्ये असून त्यांना आज सकाळी मुंबईतून बोलावणे आल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसभवनात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यकमाबाबत बैठक झाली. या बैठकीत नगरसेवक चेतन नरोटे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे वृत्त दाखवले. त्यावर इतर कार्यकर्त्यांनी याबाबत आनंद व्यक्त करुन सर्वजण मुंबईला जाण्याची तयारी करुया अशी सूचना मांडली.

प्रकाश वाले यांनी आमदार शिंदे यांना फोन करून संपर्क साधून मंत्रिमंडळ समावेशाबद्दल सोलापूरात चर्चा सुरु झाली आहे. आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे का ? अशी विचारणा केल्यावर प्रणिती शिंदे यांनी आज मुंबईला बोलावले आहे, थांबा वाट पहा असा निरोप दिला. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सध्या सोलापूरमध्ये सुरु असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/