Praniti Shinde On PM Modi | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाल्या…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Praniti Shinde On PM Modi | देशात सध्या इंधनांचे दर गगनाला भिडले असून पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसच्या किमतीतही वाढ झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. याचाच धागा पकडत काँग्रेस आमदार (Congress MLA) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार टीका केली आहे. (Praniti Shinde On PM Modi)

 

काँग्रेसच्या काळात सिलेंडर 350 रूपयापर्यंत गेला होता त्यावेळी त्यांच्या मंत्र्यांनी आमचे पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांना बांगड्या पाठवल्या होत्या. बांगड्या कमी असण्याचं प्रतीक नाही मात्र त्यातून त्यांनी काय सिद्ध केलं?, आता सिलेंडरची किंमत 1000 रूपये इतकी झाली आहे. आम्ही त्यांना नेमकं काय पाठवू, असा सवाल करत प्रणिती शिंदे यांनी मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी ईडीच्या (ED) होणाऱ्या कारवायांवरूनही सरकारवर टीका केली आहे.

 

आता जे या पद्धतीने ईडीचा वापर करत आहेत, हाच गेम त्यांच्यावरच उलटणार आहे. आता तेच होताना देखील दिसत आहे.
शेवटी या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत. काँग्रेसने कधीच त्यांचा वापर केला नाही आणि तशी आमची संस्कृतीसुद्धा नसल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
कोल्हापूर पोटनिवडणूकीच्या प्रचारावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, ईडी ठराविक गुन्ह्यांमध्येच तपास करते. त्यांनी तशाच प्रकारे निवडक गुन्ह्यांमध्ये तपास करायला हवा.
पण आता कुणी छोटंसं काही केलं तरी हे ईडी आणतात, असं म्हणत प्रणिती यांनी भाजपवर टीका केली.

 

Web Title :- Praniti Shinde On PM Modi | congress mla praniti shinde criticises bjp and centre pm modi govt over inflation ed action issues

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mrunal Thakur Oops Moment | फॅशनच्या नादात मृणाल ठाकूर झाली Oops Moment ची शिकार, इंटरनेटवर व्हिडिओ झाला व्हायरल..

 

Pune Crime | 28 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत डॉक्टरला गंभीर मारहाण

 

Deepika Padukone Airport Look | एअरपोर्टवर अशा कपड्यात दिसली दीपिका पादुकोन, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

 

Sharad Pawar On Maharashtra Home Department | राष्ट्रवादी आपलं गृहखातं शिवसेनेला देणार ?; शरद पवारांनी जरा स्पष्टच सांगितलं…