Praniti Shinde | आमदार प्रणिती यांच्या मंत्रिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंनी आमदाराला पाडले; ‘या’ माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Praniti Shinde | राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचं कमळ हाती घेतलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे (Laxmanrao Dhoble) यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आपल्या मुलीला अर्थात आमदार आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांना मंत्रिमंडळात अडचण निर्माण होऊ नये म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनीच अक्कलकोटचे कॉंग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडणुकीत पाडल्याचा गंभीर गौप्यस्फोट माजी मंत्री ढोबळे यांनी केला आहे.

आपल्या विरोधात उमेदवार कोण असावा हे देखील सुशीलकुमार शिंदेच (Sushilkumar Shinde) ठरवत आले आहेत.
पण, राज्य मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आपल्या मुलीला अडचण होऊ नये म्हणून म्हेत्रेंना पाडण्याचे काम सुशीलकुमार शिंदे यांनीच केले आहे.’
असा एक मोठा गौप्यस्फोट लक्ष्मणराव ढोबळे (Laxmanrao Dhoble) यांनी केला आहे.
1 ॲागस्ट काल लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
या भूमिपूजनावेळी लक्ष्मणराव ढोबळे हे उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावेळी यावेळी भाजप आमदार विजयकुमार देशमुख, आण्णाभाऊ साठे यांची सून सावित्रीबाई साठे, महापौर श्रीकांचना यन्नम,
नगरसेवक सुनील कामाठी आदी नेते उपस्थित होते.

 

त्यावेळी बोलताना लक्ष्मणराव ढोबळे (Laxmanrao Dhoble) म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) म्हणाल्या की, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात स्मार्टसिटीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला.
तसेच आता शहर उत्तर मतदारसंघात आम्ही लक्ष घालणार आहोत.
मात्र ताई माझे तुम्हाला आव्हान आहे की, तुम्ही शहर उत्तर मधून विधानसभा निवडणूक लढवून दाखवा. एकदा लढाई होऊन जाऊद्या. उगाच नुरा कुस्ती करणाऱ्यांनी राजकारणावर बोलू नये.
त्याचबरोबर दुहेरी जलवाहिनीवरुनही त्यांनी आमदार प्रणिती शिंदेंवर देखील टीका केलीय.
पाण्याच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला जरुर आहे.
परंतु, दुहेरी जलवाहिनीवर तुम्ही बोलू नये. ते काम आम्ही नक्की करुन दाखवू.
तुम्ही एकदा वाढपी बदलून बघा.’ असा टोला देखील ढोबळे (Laxmanrao Dhoble) यांनी लगावला आहे.

 

 

Web Title : Praniti Shinde | sushilkumar shinde defeats mla for pranit shinde ministerial post say former minister laxman dhoble

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

e-RUPI | पीएम नरेंद्र मोदी यांनी केले e-RUPI लाँच, म्हणाले – ‘आज डिजिटल ट्रांजक्शनला एक नवीन आयाम देतोय’

Palghar Crime | सेल्फीचा नाद पडला महागात ! मित्रांसोबत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी गेलेल्या मुलाचा धरणात बुडून मृत्यू

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले – ‘मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते, पण…’