प्रणिती शिंदेंची एमआयएम उमेदवार फारुक शाब्दी यांच्याशी कडवी झुंज, फक्त 6 हजार मतांचा फरक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, अपक्ष उमेदवार महेश कोठे, एमआयएमचे फारुक शाब्दी आणि शिवसेनेचे दिलीप माने यांच्यात जबदस्त फाइट पाहायला मिळाली. या उमेदवारामध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. प्रणिती शिंदे या पहिल्या फेरीत आघाडीवर असताना त्यानंतर त्या पिछाडीवर पडल्या. यामुळे शेवटच्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांना आपली हॅट्रिक पूर्ण करता येईल की नाही अशी चिंता आहे. प्रणिती शिंदे यांना विरोधकांशी जोरदार झुंज द्यावी लागत आहे. काँग्रेस आणि सुशील कुमार शिंदेसाठी धाकधूक वाढली आहे. फारुक शाब्दी यांनी 10 फेरीत त्यांना 9 हजार 523 मतांनी जोरदार कडवी झुंज देत होते तर शिवसेनेचे दिलीप माने हे देखील 3 हजार मतांनी प्रणिती शिंदेंना पिछाडीवर सोडून आघाडीवर होते. प्रणिती शिंदे या 4 हजार मतांना पिछाडीवर होत्या.

आता 12.50 वाजताच्या आकडेवारीनुसार प्रणिती शिंदे आणि फारुक शाब्दी यांच्यात चुरस सुरु आहे, त्यांच्या लिडमध्ये फक्त 6000 मतांचा फरक आहे. तर अपक्ष उमेदवार महेश कोठे यांच्यात आणि प्रणिती शिंदे यांच्या मतदानात फक्त 7 हजार मतांचा फरक आहे. सध्या प्रणिती शिंदे यांना 29941 मते मिळली आहे तर फारुक शाब्दी हे 23941 मतांवर आहेत. ही लढत खूपच चूरशीची झाली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी मैदानात आहेत. प्रणिती यांच्या विरोधात शिवसेनेने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय महेश कोठे हे अपक्ष उभे आहेत तर एमआयएमचे फारूख शाब्दी हे मैदानात आहे. दरम्यान शिवसेनेचे दिलीप माने आणि अपक्ष महेश कोठे यांनी प्रणिती शिंदे यांना जोरदार लढत दिल्याचे दिसत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, प्रणिती शिंदे या आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून प्रणिती यांच्याविरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम निवडणुकीच्या मैदानात उभे होते. मागील दोन विधानसभा प्रणिती शिंदे आमदार राहिल्या आहेत, परंतू यंदाचा जनमताचा कौल त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहे. शिवसेनेचे दिलीप माने चांगल्या मताने आघाडीवर आहे. यंदाच्या निवडणूकीत 55.47 टक्के मतदान झाले होते.

Visit : Policenama.com