प्रणिती शिंदेंचा जळगाव दौरा पडला महागात ! आमदार चौधरी, माजी खासदारासह इतर पदाधिकार्‍यांवर FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाने लॉकडाऊन लावलेला आहे. अशातच काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेले नियमे पायदळी तुडवल्याने त्या बैठकीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणावरून मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आमदार प्रणिती शिंदे १५ मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्य. त्यांच्या उपस्थितीत अजिंठा शासकीय विश्रामगृहावर दुपारी १ ते सायंकाळी ५ या कालावधीत बैठक घेतली. तर बैठकीचे आयोजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीप पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले होते. बैठक घेण्याआधी संबंधितांनी पोलीस प्रशासनाची कुठलीही घेतली नाही. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचा फज्जा उडवत अनेकजण विना मास्क देखील होते.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या सर्वच नियमांचे उल्लंघन या बैठकीत झाले होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रावेर काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी अध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अन्य २० ते २५ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान, आमदार हर्षल सुभाष पाटील यांनी याबाबत तक्रार दिली आहे. IPC कलम १८८, २६९ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.