Prarthana Behere | ‘बेशरम रंग’ या गाण्यावर ‘या’ मराठी अभिनेत्रीचा हॉट अंदाज; चाहते घायाळ
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Prarthana Behere | सध्या अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात जरी अडकत असला तरी शाहरुखला त्याच्या चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकनी परिधान केल्यामुळे काही हिंदू संघटनांनी आणि भाजपाने यावर आक्षेप घेतला होता. मात्र सध्या सोशल मीडियावर बेशरम रंग हे गाणे जोरात वायरल होताना दिसत आहे. (Prarthana Behere)
या गाण्यावर अनेकांनी आता व्हिडिओज बनवले आहेत. याच गाण्यावर व्हिडिओ बनवण्याचा मोह मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिला देखील आवरता आले नाही. नुकताच प्रार्थनाने या गाण्यावर व्हिडिओ बनवत तिच्या Instagram अकाउंट वर शेअर केला आहे. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामधील प्रार्थनाच्या हॉट आणि सेक्सी लूक चाहत्यांना घायाळ करत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रार्थनाने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस बॉडिफिट परिधान केले आहे.
प्रार्थनाने शेअर केलेले हे व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसत आहे.
यावर अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुक केले. तर दुसरीकडे काहींनी तिला ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
सध्या इंटरनेटवर तिचा हा व्हिडिओ धुमाकूळ घालत असून त्याने सोशल मीडियाचे वातावरण तापवले आहे.
Web Title :- Prarthana Behere | marathi actress prarthana behere made a video of pathans besharam rang song
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती