Prasad Lad | NIA कारवाईतून बड्या नेत्यांची नावं उघड होणार, भाजप नेते प्रसाद लाड यांच्या दाव्यामुळे खळबळ

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) स्लिपर सेल (Slipper Cell) असलेल्या अनेक ठिकणांवर एनआयएने National Investigation Agency (NIA) मुंबईत धाडी टाकल्या. या प्रकरणामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सुचक विधान केले आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या चौकशीतूनच एनआयएने (NIA) या पुढील कारवाया केल्या आहेत. एनआयएच्या कारवायातून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील, असा दावा प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे.

 

चमचेगिरी किती आणि किती वेळ करावी…

लिलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या एमआरआय रिपोर्टमधल्या फोटोसंदर्भात जाब विचारणाऱ्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former Mayor Kishori Pednekar) आणि मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांना प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उत्तर दिले आहे. चमचेगिरी किती करावी आणि किती वेळ करावी याला मर्यादा. हिच चौकशी कोरोना काळात केली असती तर महाराष्ट्राला आवडले असते. महापालिकेच्या दवाखान्यात (BMC Hospital) किती भ्रष्टाचार (Corruption) झाला हे जाहीर करावे आणि हे थोटांड बंद करावे, अशा शब्दांत प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी टीका केली आहे.

 

सरकारी वकील शिवसेनेचे प्रवक्ते

सरकारी वकील प्रदीप घरत (Public Prosecutor Pradip Gharat) हे सरकारी वकील कमी आणि शिवसेनेचे प्रवक्ते (Shivsena Spokesperson) म्हणून काम करत आहेत. त्यांनी पंतप्रधानाबद्दल (PM) केलेली वक्तव्य खेदजनक होती. नवनीत राणा यांना विशिष्ट विषयांवर माध्यमांशी बोलू नये अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. सरकारमधील मंत्री नेते आणि सरकारी वकील यंत्रणा बनून राणा दाम्पत्याला (Rana Couple) अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, याचा निषेध करतो अशी भूमिका नवनीत राणा यांना तुमचा जामिन रद्द का करु नये अशा दिलेल्या नोटीसी संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

हुंकार की खुंकार याचं उत्तर फडणवीस देतील

हुंकार की खुंकार याचं उत्तर आम्ही मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभेतून देवू. स्वत:च्या तोंडावरचा मास्क काढून जनतेला दाखवण्याचे धैर्य मुख्यमंत्र्यांनी (CM) दाखवावं. हिंदुत्व हिंदुत्व म्हणून जनतेच्या समोर जावं लागतंय. हिंदुत्वाचा हुंकार आम्हाला दाखवू नये, अशी टीका प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेनेवर केली.

 

Web Title :- Prasad Lad | bjp leader prasad lad claims that nia action will reveal the names of big leaders

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा