म्हणून प्रभास झाला भावूक ; म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या बाहुबली या सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या सिनेमाने प्रभासच्या लोकप्रियतेत इतकी वाढ झाली की, त्याच्या चाहत्यांमध्ये सातासमुद्रापार असणाऱ्या लोकांचीही भर पडली. बाहुबली द बिगिनिंग आणि बाहुबली द कन्क्लुजन या दोन्ही सिनेमांनी अनेक नवीन विक्रम करत एक नवा इतिहास रचला. बाहुबली द कन्क्लुजन या सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

 

आपल्या पोस्टमध्ये प्रभास म्हणतो की, “दोन वर्षांपू्र्वी बाहुबली द कन्क्लुजन हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा दिवस माझ्यासाठी कायम भावनिक असेल. एस एस राजामौली आणि संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे. माझ्यावर आणि या सिनेमावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचा मी खूप खूप आभारी आहे.” प्रभासने अलीकडेच इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरु केले आहे. या सिनेमात प्रभास व्यतिरीक्त राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, सत्यराज आणि रम्या हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते.

 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या प्रभास त्याचा आगामी सिनेमा साहोच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तो अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. त्याला या अ‍ॅक्शन सीनचे प्रशिक्षण देण्यासाठी खास टीम बोलावण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/BuiOsLol7QJ/?utm_source=ig_embed