अवमान केस : प्रशांत भूषण यांच्यावर सुप्रीम कोर्टाने लावला 1 रुपयाचा दंड, न चुकवल्यास 3 महिने जेल

नवी दिल्ली : वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या विरूद्ध कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज आपला निर्णय सुनावला. न्यायसंस्थेच्या विरूद्ध आपल्या दोन ट्विटवरून न्यायालयाचा अवमान केल्याने दोषी ठरवलेले वकिल प्रशांत भूषण यांच्यावर सुप्रीम कोर्टाने 1 रुपयांचा आर्थिक दंड लावला. सोबतच कोर्टाने म्हटले ही रक्कम जमा न केल्यास त्यांना तीन महिन्यांचा कारावास होऊ शकतो.

यापूर्वी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी प्रशांत भूषण यांच्या शिक्षेवर आपला निर्णय राखून ठेवला होता. माफी मागण्यास यापूर्वीच नकार दिलेले प्रशांत भूषण यांना कोर्टाने 30 मिनिटांचा वेळ दिला होता आणि म्हटले होते की, आपल्या भूमिकेवर विचार करावा. परंतु, यानंतर सुद्धा भूषण यांनी आपला विचार न बदलल्याने कोर्टाने विचारले की, माफी मागण्यात काय चूक आहे, हा खुप वाईट शब्द आहे का? न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठने भूषण यांच्या विरूद्ध आपला निर्णय सुनावला.

अवमान प्रकरणात निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, जर प्रशांत भूषण यांनी 1 रुपया दंड भरला नाही तर त्यांना 3 महिन्यांची जेल होऊ शकते किंवा तीन वर्षापर्यंत वकिली करण्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.

प्रशांत भूषण यांनी न्यायालयाची माफी न मागण्याचा विचार केल्याने वरिष्ठ अधिवक्ता राजीव धवन यांनी 25 ऑगस्टला प्रमुख न्यायालयाला विनंती केली होती की, कोर्टाकडून स्टेट्समॅन सारखा संदेश दिला गेला पाहिजे आणि भूषण यांना शहीद बनवू नये. तीन न्यायाधीशांच्या पीठाचे नेतृत्व करणारे न्यायमूर्ती मिश्रा यांनी शिक्षेच्या मुद्द्यावर त्यादिवशी निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती मिश्रा 2 सप्टेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.

सुप्रीम कोर्टने 14 ऑगस्टला भूषण यांना न्यायपालिकेविरूद्ध दोन अपमानकारक ट्विट केल्याने गुन्हेगारी अवमानासाठी दोषी ठरवले होते. भूषण यांची बाजू मांडणारे धवन यांनी भूषण यांच्याबाबत म्हटले की, प्रमुख न्यायालयाला विनंती केली होती की, त्यांनी आपला 14 ऑगस्टचा निर्णय मागे घ्यावा आणि कोणतीही शिक्षा देऊ नये. त्यांनी विनंती केली की, हे प्रकरण बंद करावे, आणि वादाचा सुद्धा शेवट केला पाहिजे.

अटर्नी जनरलने माफ करण्याची केली विनंती
तर, अटर्नी जनरल के. के वेणुगोपाल यांनी न्यायालयाला विनंती केली की, त्यांनी भूषण यांना संदेश देऊन भविष्यात असे कृत्य करू नये असे म्हणून माफ करावे.

कोर्टात गांधीजींच्या विचारांचा उल्लेख
प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, त्यांना या गोष्टीचे दुख आहे की, त्यांना या प्रकरणात खुप चुकीचे समजले गेले. ते म्हणाले, मी ट्विटद्वारे आपले परम कर्तव्य करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचे विचार मांडताना प्रशांत भूषण म्हणाले होते, मी दयेची भीक मागत नाही आणि मी माझ्या उदारतेचे आवाहन करत नाही. मी येथे कोणत्याही शिक्षेला स्वीकारण्यासाठी आलो आहे, जी मला त्या गोष्टीसाठी दिली जाईल, ज्यास कोर्टाने गुन्हा मानले आहे, पण माझ्या नजरेत ती चूक नाही, तर नागरिकांसाठीचे ते माझे कर्तव्य आहे.

कधीच्या ट्विटचे प्रकरण आहे
सुप्रीम कोर्टाने ट्विटरवर न्यायाधीशांबाबत केलेल्या टिप्पणीसाठी 14 ऑगस्टला त्यांना दोषी ठरवले होते. प्रशांत भूषण यांनी 27 जूनला न्यायपालिकेच्या सहा वर्षांच्या कामकाजाबाबत टिपण्णी केली होती, तर 22 जूनला मुख्य न्यायाधीश एक. ए. बोबडे तथा चार माजी मुख्य न्यायाधीशांबाबत दुसरी टिप्पण्णी केली होती.