×
Homeताज्या बातम्याPrashant Damle | प्रशांत दामले यांना ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’चा अक्षय्य पुरस्कार...

Prashant Damle | प्रशांत दामले यांना ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’चा अक्षय्य पुरस्कार जाहीर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ज्येष्ठ अभिनेते प्रशांत पुरुषोत्तम दामले (Prashant Damle) यांनी विविध मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना कित्येकदा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदवले गेलेत. तसेच प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनीदेखील सन्मानित केले गेले आहे.

 

यावर्षी नाशिकच्या ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ या शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अक्षय्य पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून शाल, श्रीफळ, रु. 25000, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील दोन वर्षे करोनामुळे पुरस्कार वितरीत होऊ शकला नाही. याआधी सामाजिक कार्यासाठी डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे, क्रीडासाठी कविता राऊत, प्रशासनासाठी माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, संगीतसाठी पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटासाठी सचिन पिळगांवकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सोमवारी 30 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात दामले
यांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळ्यानंतर दामले यांची प्रकट मुलाखत सुधीर गाडगीळ घेणार आहेत.
पुरस्कार सोहळ्यास नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी केले आहे.

 

Web Title :- Prashant Damle | akshaya award of the new education institute nashik to actor prashant damle

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | एकाच कुटुंबातील 7 जणांच्या आत्महत्येचे गुढ उकलले, मुलाने मुलीला पळवून नेलं अन्…, पुणे जिल्ह्यात खळबळ

Jayant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘लोक फार हुशार आहेत, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना…’

Devendra Fadnavis | या दिवशी होणार राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तारिख

Must Read
Related News