पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (ABMNP) अध्यक्ष व मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना मातृशोक झाला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले (Vijaya Damle) यांचे आज (दि.06) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. (Prashant Damle) त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रशांत दामले (Prashant Damle mother Passed Away) यांच्या आंबोली अंधेरी येथील राहत्या घरामध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. या बातमीमुळे मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनोरंजन विश्वामध्ये अनेक दशके आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या प्रशांत दामले
यांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) हे नाटकाच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये होते.
आईच्या निधनाची वार्ता कळताच त्यांनी मुंबईकडे धाव घेतली.
आज सायंकाळी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आंबोली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत. चित्रपट विश्वातील अनेकांनी प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात