Prashant Damle | अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामले यांचा भरघोस मतांनी विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Prashant Damle | पंचवार्षिक अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूकीचा निकाल (Election Results) आज अखेर जाहीर झाला. या परिषदेचं अध्यक्षपद नक्की कोणाला मिळणार याकडे साऱ्या नाट्यसृष्टीचे लक्ष लागले होते. आज झालेल्या मतमोजणीत अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची भरघोस मतांनी निवड झाली आहे. त्यांनी एकूण ६० पैकी ५० मतं मिळवून हा विजयश्री मिळवला आहे.
अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चुरसीची लढत बघायला मिळाली. प्रशांत दामले विरूद्ध प्रसाद कांबळी यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. या संपूर्ण निवडणूकीत ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे वर्चस्व पाहायला मिळाले.
कार्यकारिणीवर प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे वर्चस्व पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगें आदींचा समावेश आहे.
नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी (Gurunath Dalvi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकीसंदर्भात माहिती दिली. यासोबतच कोणत्या पदासाठी कोण निवडून आले तेही सांगितले. ते म्हणाले की,’नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. कार्यवाहपदी अजित भुरे, तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली.’
विजयी झालेले उमेद्वार
१.अध्यक्ष- प्रशांत दामले
२.सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे
३.उपाध्यक्ष – नरेश गडेकर
४.उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर
५.खजिनदार- सतीश लोटके
पराभूत झालेले उमेद्वार
१.प्रसाद कांबळी
२.सुकन्या कुलकर्णी
३.ऐश्वर्या नारकर
४.अविनाश नारकर
Web Title : Prashant Damle | prashant damle will president of akhil bharatiya marathi natya parishad prasad kambli
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- 16 MLAs Disqualification | जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता हे आधी ठरवावे लागेल, नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया
- Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- Maharashtra Politics News | ‘फडणवीसांची काहीतरी मजबूरी दिसतेय’, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरुन ठाकरे गटाचा टोला